महाराष्ट्रात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : मुंबई वेधशाळेने राज्यातील हवामानाचा पुढील चार दिवसांचा अंदाज जाहीर केला असून, २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर
नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.
२३ सप्टेंबर
नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.
२४ सप्टेंबर
सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.
२५ सप्टेंबर
वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.
विजांच्या कडकडाटात नागरिकांनी काळजी घ्यावी
यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः वादळी वातावरणात मोकळ्या परिसरात थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

