...

Maharashtra HSC Result 2026 : १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ; निकालाची तारीख जाहीर

 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत. (maharashtra hsc 12th result 2026 date time)

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

* results.digilocker.gov.in
* mahahsscboard.in
* hscresult.mkcl.org

विद्यार्थ्यांना निकालाची प्रत (Print Out) घेता येणार असून DigiLocker App वर डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहता येणार आहे.

 

Maharashtra IPS Transfer 2026। आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या ; पुण्यासह अनेक जिल्ह्यांत फेरबदल

 

गुणपडताळणी, छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा
निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ३ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन सुरू राहणार आहे. अर्ज करताना शुल्क Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे भरता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

 

Local ad 1