10th result | दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली ! उद्या जाहीर होणार निकाल

10th result | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी (१७ जून) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (The wait for the 10th result is over! The result will be tomorrow)

 

 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

 

 

याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खालील अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

Local ad 1