Maharashtra Board HSC Results 2023 live । बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा 91 टक्के निकाल

Maharashtra Board HSC Results 2023 live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १२ वीच्या निकाल ऑनलाईन जाहीर केला आहे. त्यात राज्याचा 91.25 टक्के निकाल लागला असून, कोकण  विभागाचा सर्वाधिक 96. 01 टक्के सर्वांत कमी मुंबई विभागाचा 88.13 टक्के निकाल लागला आहे, ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता निकाल पाहण्यासाठी उपलब्ध होईल. (Maharashtra Board HSC Results 2023 live)

 

निकाल ‘येथे’ पाहता येणार :

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

 

राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता १२ वीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ असलेल्या https://mahresult.nic.in/ वर पाहता येईल.

 

विभाग निहाय निकाल

पुणे : 93.34 टक्के, नागपूर : 90.35 टक्के, औरंगाबाद: 91.85 टक्के, मुबई: 88.13 टक्के ,कोल्हापूर: 93.28 टक्के, अमरावती: 92.75 टक्के, नाशिक: 91.66 टक्के ,लातूर: 90.37 टक्के, कोकण: 96.01 टक्के निकाल लागला आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या. (Maharashtra Board HSC Results 2023 live)

 

सविस्तर बातमी थोड्यावेळात देत आहोत

 

 

निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. (Maharashtra Board HSC Results 2023 live)
Local ad 1