...

Maharashtra IPS Transfer 2026। आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या ; पुण्यासह अनेक जिल्ह्यांत फेरबदल

Maharashtra IPS Transfer 2026 मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या शिफारशींनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२नुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन आदेश ३० एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.  यामध्ये राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। या बदल्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि उप आयुक्त पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. जालना येथील पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य येथे बदली करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Purandar Airport News : घरासह फळबागांचेही मिळणार वेगळे पैसे; प्रशासनाचा सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा ‘प्लॅन’!

 

 

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. अहमदनगरचे (अहिल्यानगर) पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नि. व स.), पोलीस महासंचालक कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे.

 

परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांच्या स्टाफ ऑफिसर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली असून, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मोडोंपत एस. स्वामी यांची नाशिक ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पुण्याशी संबंधित बदल्यांमध्ये वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची लोहमार्ग पोलीस अधीक्षक, पुणे येथे नियुक्ती झाली आहे. तर पुण्यातील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.

 

नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली मुंबई शहर पोलिस उपायुक्त, लोहमार्ग पुणेच्या अधीक्षक आश्विनी जगताप यांची बदली नंदुरबारच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

आयुष नोपानी,”अपर पोलीस अधीक्षक, जालना”,”पोलीस अधीक्षक, चंद्रपूर”. पंकज कुमावत,”अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)”,”पोलीस अधीक्षक, परभणी”. निकेतन कदम,”पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपूर”,”पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)”. सुरज गुंजाल,”अपर पोलीस अधीक्षक, परभणी”,”अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव”.गजानन राजमाने,”पोलीस अधीक्षक, फोर्स वन”,”पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर”. दत्ता लक्ष्मण तोटेवाड,स्टाफ ऑफिसर (अपर पोलीस महासंचालक),”अपर पोलीस अधीक्षक, अमरावती”.

 

गृह विभागाने आदेशात नमूद केले आहे की, पोलीस महासंचालकांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करून पुढील आवश्यक कार्यवाही करावी. शासनाचा हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

 

 

Local ad 1