...

2025 ची नवी प्रभाग रचना : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय

जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा यांच्यातील समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण करा

मुंबई | राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निवडणूक प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय घेतला आहे. (prabhag rachana jilha parishad panchayat 2025)जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांची नवी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असून यासाठी शासनाने आवश्यक आदेश जारी केले आहेत. (जिल्हा परिषद निवडणूक 2025) ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा यांच्यातील समन्वय साधून ही प्रक्रिया राबवा अशा सूचना दिल्या आहेत.  (स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये ही प्रभाग रचना केली जात आहे. याअंतर्गत मागील 2022 च्या निवडणुकीच्या धर्तीवरच यंदाही ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (prabhag rachana jilha parishad panchayat 2025)

 

 

PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?

 

 

प्रभाग रचनेसाठी तयार करण्यात येणारे परिशिष्ट 

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत विविध परिशिष्ट तयार केली जात आहेत. 

  • जिल्हा परिषद सदस्य संख्या (परिशिष्ट-1अ)
  • पंचायत समिती सदस्य संख्या (परिशिष्ट-1ब)
  • विद्यमान लोकसंख्या व सामाजिक घटकांची यादी (परिशिष्ट-2अ, 2ब)
  • अनुसूचित जाती व जमातीचे प्रमाण (परिशिष्ट-3अ, 3ब)
  • आरक्षण यादी (परिशिष्ट-4)
  • प्रभाग नकाशा व फेरफार प्रस्ताव (परिशिष्ट-5, 6)
  • जाहीर सूचना व हरकतींची नोंद (परिशिष्ट-7 ते 9)
  • अंतिम अधिसूचना (परिशिष्ट-10)

 

महत्वाचे ! महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपरिषद प्रभाग रचना कार्यक्रम २०२५ जाहीर

 

 

आरक्षण प्रक्रियेचा न्याय्य आधार

या प्रक्रियेमुळे प्रभाग रचनेत जनगणनेनुसार आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व इतर घटकांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यामध्ये आरक्षण रोटेशन व मागील फेरफारांचाही विचार केला जाणार आहे. प्रभाग रचना करताना “Zip-lock principle” चा अवलंब करून सीमांकन शक्यतो एकसंध ठेवले जाईल. (पंचायत समिती प्रभाग रचना)

 

prabhag rachana jilha parishad panchayat 2025
prabhag rachana jilha parishad panchayat 2025

 

निवडणूक यंत्रणा आणि जबाबदाऱ्या

राज्यात निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून विविध स्तरांवरील अधिकारी कार्यरत असणार आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हे अधिकारी कार्यरत राहणार आहेत. (महाराष्ट्र निवडणूक तयारी)

 

प्रमुख जबाबदाऱ्या

  • अद्ययावत मतदार यादी तयार करणे. (जिल्हा परिषद प्रभाग आरक्षण)
  • मतदान केंद्रांचे स्थान निश्चित करणे.
  • निवडणूक साहित्याची व्यवस्था (बॅलट बॉक्स, मतपत्रिका, स्वच्छता साधने).
  • मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.
  • वाहन व वाहतूक नियोजन.
  • पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था.
  • निवडणूक खर्चाचे नियोजन व निधी व्यवस्थापन.
  • जनजागृती व माहितीचा प्रसार.
  • मतदान केंद्रावर आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे.

तांत्रिक साधनांचा वापर

प्रभाग रचनेत उपग्रह नकाशे (Satellite Maps), GIS तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे प्रभाग सीमांकन अधिक अचूक व वैज्ञानिक पद्धतीने केले जात आहे.

जनतेला हरकती व सूचना देण्याची संधी

प्रारूप प्रभाग रचनेनंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त हरकतींचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल.

३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक

राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांमध्ये ही सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक यंत्रणा कामकाज हाती घेत आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधीत्व अधिक न्याय्य, पारदर्शक व सर्वसमावेशक होणार आहे. ग्रामविकास विभाग आणि जिल्हा प्रशासन परिपूर्ण नियोजनासह निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे (prabhag rachana jilha parishad panchayat 2025)


बातमीचा सोर्स – राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा आदेश

Local ad 1