Buldhana Bus Accident । समृद्धी महामार्गावर खासगी बसला लागलेल्या आगीत 25 प्रवशांचा मृत्यू

Buldhana Bus Accident :  नागपूरहून पुण्याला (Nagpur to Pune) जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. त्यात बसमधून  25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. (25 passengers died in private bus fire on Samriddhi highway)

 

 

ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात (At Pimpalkhuta Village near Sindkhed Raja on Samuddhi Highway) अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

 

बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मा त्र,आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते.

Local ad 1