Buldhana Bus Accident। समृद्धी महामार्गावर खासगी भिषण बसचा भीषण अपघात ; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
Buldhana Bus Accident । मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. (Accident of private bus on Samriddhi highway; The Chief Minister expressed condolences)