...

“Wait and Watch” नको, मुलांसाठी वेळेत तपासणी गरजेची !

पुणे | प्रतिनिधी
मुलांच्या बोलण्यात, वागण्यात किंवा शिकण्यात लहान पण वारंवार दिसणाऱ्या अडचणी दुर्लक्ष करू नयेत, असा सल्ला Walnut Child Development Clinics ने पालकांना दिला आहे. “थोडं थांबून पाहू” या विचाराऐवजी वेळेत तपासणी (Early Checks) केल्यास मुलांच्या विकासाला योग्य दिशा मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक विकासात्मक अडचणी सुरुवातीला फार गंभीर वाटत नाहीत. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यास, नियम आणि सामाजिक दबाव वाढल्यावर त्या अधिक ठळक होतात. अशा वेळी उशीर झालेला हस्तक्षेप मुलांसाठी आणि पालकांसाठीही अडचणीचा ठरू शकतो. (walnut child development clinics-early checks child development pune-pcmc baramati)

 

 

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली

 

कोणती लक्षणे दिसल्यास तपासणी गरजेची?

* मूल उशिरा बोलत असेल किंवा शब्द नीट उच्चारत नसेल
* डोळ्यांत नजर न मिळवणे
* सूचना समजून घेण्यात अडचण
* वारंवार चिडचिड, रडणे किंवा रागाचे झटके
* लक्ष कमी वेळ टिकणे
* आवाज, स्पर्श किंवा अन्नाबाबत अतीसंवेदनशीलता

 

एकाच ठिकाणी सर्व उपचार

Walnut Child Development Clinics मध्ये स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेविअरल थेरपी, मानसोपचार, विशेष शिक्षण आणि बाल फिजिओथेरपी अशा सेवा एकाच छताखाली दिल्या जातात. सर्व तज्ज्ञ एकत्र काम करत असल्याने पालकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळते. ही केंद्रे ऑटिझम, ADHD, स्पीच डिले, शिकण्याच्या अडचणी आणि इतर विकासात्मक समस्यांवर काम करतात.

 

 

तज्ज्ञ काय सांगतात?

Walnut Child Development Clinicsच्या संस्थापक डॉ. चंचल अग्रवाल म्हणाल्या, “अनेक पालकांना वाटतं की मूल आपोआप सुधारेल. पण तसं न झाल्यास मूल निराश होतं. लवकर तपासणी म्हणजे लेबल लावणं नाही, तर योग्य मार्गदर्शन मिळवणं आहे.”

 

पुणे, PCMC आणि बारामतीत सेवा

५,००० हून अधिक कुटुंबांना सेवा दिलेल्या Walnut Child Development Clinicsची केंद्रे पुणे, पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि बारामती येथे कार्यरत आहेत.

अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंटसाठी
📞 फोन: +91 86685 46502
🌐 वेबसाइट www.walnutclinics.com, http://www.walnutclinics.com

 

Local ad 1