व्हिडीओ । वंदे भारतचे चाक रुळावरून घसरले, प्रवाशांमध्ये एकच खळबळ

 

पुणे, दि. 27 एप्रिल : पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक तांत्रिक घटना घडली. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर प्रवेश करत असताना कोच क्रमांक C-15 च्या ट्रॉलीचे (चाकांचा सेट) एक चाक डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरले. पुणे विभागाचे पीआरओ व प्रादेशिक वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बहेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ट्रेन स्थानकात येत असताना घडली. सुदैवाने या प्रकारात एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. (vande bharat derailment pune station news marathi)

 

 

घटनेची माहिती मिळताच रेल्वेची क्विक रिस्पॉन्स टीम, RPF आणि तिकीट तपासणी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले.

 

व्हिडीओ । वंदे भारतचे चाक रुळावरून घसरले, प्रवाशांमध्ये एकच खळबळ

 

 

दरम्यान, पुणे स्थानकापासून सुमारे 500 ते 1000 मीटर अंतरावर ट्रेन थांबल्याने प्रवाशांना आपले सामान घेऊन चालत स्टेशनकडे यावे लागले. कुली, RPF आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मदत केली. विशेष रेल्वे गाडीचीही व्यवस्था करण्यात आली होती.

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले की, “ट्रेनचे केवळ एक चाक डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरले आहे. संबंधित डायमंड क्रॉसिंग तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले असून देशभरातील अशा नॉन-स्टँडर्ड क्रॉसिंग हटवण्याचे काम सुरू आहे.”

 

रेल्वे प्रशासनाकडून गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 

Local ad 1