Transfers of IPS Officers । दिवाळीच्या पुर्वसंध्येला राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Transfers of IPS Officers । दिवाळीच्या पुर्वसंधेला शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांची (Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) बदली झाली आहे. अंकित गोयल (IPS Ankit Goyal) आता पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.नांदेड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी मुंबईतील पोलीस उपायुक्त श्रीकृषण कोकाटे (Shri Krishan Kokate, Deputy Commissioner of Police, Mumbai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह 24 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केला आहे.

 

 

राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उप आयुक्त तसेच पोलिस अधिक्षक (Superintendent of Police) पदाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह (Mumbai, Thane, Pune, Nagpur) अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परभणीत महिला राज पहायला मिळाले आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तां नंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक ही महिलाच झाल्या आहेत.

 

 

रागसुधा आर परभणीच्या नवीन पोलीस अधीक्षक आहेत. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली झाली आहे. रागसुधा आर ह्या, यापूर्वीही सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून परभणीत आल्या होत्या. (On the eve of Diwali, 24 IPS officers have been transferred in the state.)

 

सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचीही बदली झाली आहे.त्यांच्या ठिकाणी बसवराज तेली सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक आहेत. (On the eve of Diwali, 24 IPS officers have been transferred in the state.)

भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अथिक्षक दर्जाच्या अधिकाच्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत. नांदेड चे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची बदली झाली असून नांदेडच्या नवीन पोलीस अधिक्षकपदी मुंबईतील पोलीस उपायुक्त श्रीकृषण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, शेवाळे यांच्या बदलीचे आदेश अद्याप निघालेले नाही. त्यामुळे ते वेटिंगवर आहे. (On the eve of Diwali, 24 IPS officers have been transferred in the state.)

 

नवीन ठिकाणी नियुक्त झालेले अधिकारी

 • धनंजय कुलकर्णी – पोलिस अधिक्षक, रत्नागिरी
  सचिन पाटील – पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण, औरंगाबाद
  राकेश ओला – पोलिस अधीक्षक, अहमदनगर
  एम राजकुमार – पोलिस अधिक्षक, जळगाव
  सोमय मुंडे – पोलिस अधिक्षक लातूर
  श्रीमती रागसुधा आर – पोलिस अधिक्षक, परभणी
  संदीप सिंह गिल – पोलिस अधिक्षक, हिंगोली
  श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस अधिक्षक, नांदेड
  पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
  बसवराज तेली – पोलीस अधीक्षक, सांगली
  शेख समीर असलम – पोलीस अधीक्षक, सातारा
  अंकित गोयल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
  शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
  सारंग आव्हाड – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
  गौरव सिंह – पोलीस अधीक्षक, यवतमाळ
  संदीप घुगे – पोलीस अधीक्षक, अकोला
  रवींद्र सिंग परदेशी – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
  नुरुल हसन – पोलीस अधीक्षक, वर्धा
  निखिल पिंगळे – पोलीस अधीक्षक, गोंदिया
  निलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली
  संजय बारकुंड – पोलीस अधीक्षक, धुळे
  श्रीकांत परोपकारी – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
  लक्ष्मीकांत पाटील – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
  पराग मनेरे – उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई
Local ad 1