पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ
गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही
• ‘गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन
पुणे, २१ सप्टेंबर : “पुण्याचा गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा विषय असला, तरी मुळात हा उत्सव पुणेकरांचा आहे. गणेशोत्सव आणि लोकसहभाग या वेगळ्या गोष्टी असूच शकत नाहीत. त्यामुळे पुणेकरांना अभिप्रेत आणि अपेक्षित असाच गणेशोत्सव साजरा केला जाईल. सर्वसामान्य पुणेकरांचा सहभाग अधिकाधिक वाढवून हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘लोकोत्सव’ म्हणून अधिक व्यापक करू,” अशी ग्वाही केंद्रीय सहकारिता आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून दिली.

