...

समाविष्ट गावांत ड्रेनेज लाईनचे जाळे उभारण्यासाठी ३२४ कोटींचा निधी

पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांत ड्रेनेज लाईनचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने ३२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या अमृत २ अभियानांतर्गत आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी सुमारे ८१ कोटी रुपये निधी मिळणार असून उर्वरित खर्च महापालिका उचलणार आहे. हा निधी तीन टप्प्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

 

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याचा कितवा नंबर असेल ?

महापालिका हद्दीतील अनेक समाविष्ट गावांत अद्यापही पुरेशा प्रमाणात ड्रेनेज सुविधा नाहीत. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज आदी तलावात मैलापाणी जाण्याची समस्या निर्माण झाली होती. प्रस्तावित जाळे उभारल्यानंतर या पाण्याचे संकलन व प्रक्रिया होऊन प्रदूषण आटोक्यात येणार आहे.

 

 कोणत्या गावांत काम होणार?
सुस, म्हाळुंगे, कोढवे धावडे, न्यू कोपरे, नर्‍हे, जांभुळवाडी, कोल्हेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, सणस नगर, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, खडकवासला, पिसोळी या गावांत ड्रेनेज जाळे उभारण्यात येणार आहे.

प्रकल्पाची आकडेवारी

* ड्रेनेज लाईनची एकूण लांबी : १७५.८८ कि.मी.
* कलेक्शन लाईन : ४१.७८ कि.मी.
* ट्रंक लाईन :  ११.१८ कि.मी.
* एकूण खर्च :  ३२३ कोटी ७६ लाख रुपये
* केंद्र सरकारचा वाटा : ८०.९४ कोटी रुपये
* राज्य सरकारचा वाटा : ८०.९४ कोटी रुपये
* महापालिकेचा वाटा : १६१.८८ कोटी रुपये

Local ad 1