...

५१ टक्के मतांसह सनी निम्हणांचा दणदणीत विजय ; औंध–बोपोडी प्रभागासाठी १०० दिवसांचा रोडमॅप

 

पुणे : औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील मतदारांनी भरभरून प्रेम आणि विश्वास दिला आहे. झालेल्या एकूण मतदानांपैकी तब्बल ५१ टक्के मते माझ्या पारड्यात पडली, हा मतदारांनी दाखवलेला विश्वास अमूल्य असल्याची भावना चंद्रशेखर ऊर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत मिळालेले हे यश म्हणजे विकासाला दिलेले मत असून, ही जबाबदारी अधिक वाढवणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. (pune aundh bopodi ward 8 sunny nimhhan election victory)

 

पुणे महापालिकेत नवीन चेहऱ्यांचा वर्चस्व ! अनुभव असलेल्या नगरसेवकांची संख्या घटली !

 

पुढे बोलताना सनी निम्हण म्हणाले की, औंध–बोपोडी प्रभाग ८ च्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १०० दिवसांचा सविस्तर रोडमॅप तयार असून, त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरू केली जाईल. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.

 

या विजयामागे माजी आमदार स्वर्गीय विनायक निम्हण आबा यांची पुण्याई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे खंबीर पाठबळ, भाजपचे असंख्य कार्यकर्ते तसेच ‘आबा प्रेमी’ कार्यकर्त्यांची साथ कारणीभूत ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

Local ad 1