...

पुणेकरांसाठी अलर्ट ! अभय योजनेसाठी उरले फक्त दोन दिवस; नाही भरला कर तर बसणार दंड

 

पुणे, दि. १२ : पुणे महानगरपालिकाकडून शहरातील मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेची मुदत आता अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना केवळ दोन दिवसांचा अवधी उरला असून, १५ मार्च २०२६ रोजी या योजनेची मुदत संपणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (pune abhay yojana property tax deadline 15 march)

 

अजित पवारांच्या आठवणींनी गहिवरले जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य

 

 

महापालिकेने ही योजना १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली होती. या कालावधीत शहरातील १ लाख ७६ हजार ३३५ मिळकतींची तब्बल १००५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे.

 

प्रशासनाने सुरुवातीला या योजनेची मुदत १५ जानेवारी २०२६ पर्यंत प्रस्तावित केली होती. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आयुक्तांनी ती १५ फेब्रुवारी पर्यंत वाढवली. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या स्थायी समितीतील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीवरून योजनेला पुन्हा १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

 

आता या योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने नागरिकांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे.

सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार
अभय योजनेची मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस शासकीय सुट्टी येत असल्याने महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. शनिवार (१४ मार्च) आणि रविवार (१५ मार्च) या दिवशी शहरातील सर्व करभरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंतिम मुदतीपूर्वी थकबाकी भरून दंड व व्याजातील सवलतीचा लाभ घ्यावा.

 

 

 

 

Local ad 1