MHADA Pune Housing Scheme 2026 : 20% आणि 15% योजनांसाठी अर्जास मुदतवाढ
आपले सरकार पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे डोमासाईल व उत्पन्न दाखला काढण्यात अडथळे
MHADA Pune Housing Scheme 2026 : पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सुरू असलेल्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना अंतर्गत विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (mhada pune housing scheme 2026 application deadline extended)
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रातील शिल्लक सदनिकांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया 4 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, आपले सरकार वेबपोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे अर्जदारांना डोमासाईल प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला काढण्यात अडचणी येत असल्याने म्हाडाने अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन निर्णयानुसार, अर्जदारांना 4 मे 2026 ते 13 मे 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. तसेच सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया 13 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. अर्जदारांनी अर्ज प्रक्रिया आणि सदनिकांच्या तपशीलांसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावे. bookmyhome.mhada.gov.in

