MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव
म्हाडाची घरे कोणासाठी असतात?
MHADA Lottery Pune पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ६१६८ घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्रीला सुरुवात केली आहे. या सोडतीत तब्बल ११३ घरे गरीब खासदार आणि आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. परंतु या प्रवर्गातून प्रत्यक्षात अर्ज येणार का, याकडे लक्ष लागले आहे. (Affordable Housing)
म्हाडा वेळोवेळी घरांची सोडत काढते. त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, आजी-माजी सैनिक, गृहनिर्माण महामंडळ व राज्य शासन कर्मचारी, कलाकार अशा १५ प्रवर्गांसाठी आरक्षण असते. यामध्ये खासदार-आमदारांसाठी राखीव घरांचा कोठाही समाविष्ट आहे. तसेच तसेच अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती, दिव्यांग, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, सैनिक, सरकारी कर्मचारी इ. प्रवर्गासाठी राखीव घरे असतात. यापूर्वी पुणे मंडळाच्या सोडतीत एकाही खासदार-आमदाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचा कोठा पुढे खुल्या प्रवर्गात वर्ग केला गेला आहे.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
या वेळेसुद्धा अर्ज न आल्यास दोन जाहिरातींनंतर राखीव घरे सर्वसामान्यांसाठी खुली होतील.राखीव कोठा रद्द करण्याचा प्रस्तावपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे खासदार-आमदारांसाठी दोन टक्के राखीव कोठा होता. मात्र, आदर्श घोटाळ्यानंतर तो रद्द करण्यात आला. तरीदेखील म्हाडा सोडतीत गरीब खासदार-आमदार प्रवर्ग ठेवला जातो. प्रत्यक्षात अर्ज येत नसल्याने हा कोठा रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
म्हाडाची घरे कोणासाठी असतात?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (MHADA) ही सरकारी संस्था आहे. ती प्रामुख्याने मध्यम व कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते. त्यासाठी दरवर्षी लॉटरी (सोडत) काढली जाते. म्हाडाची घरे परवडणारी हौसिंग (Affordable Housing) कोणासाठी असतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असतो. म्हाडा घरे ही कॉस्ट बेसिसवर (Cost Based) म्हणजे बांधकाम खर्च + थोडा नफा या तत्वावर विकली जातात. त्यामुळे ती मार्केटपेक्षा ३०% ते ५०% स्वस्त पडतात.
घरे खालील प्रवर्गांसाठी राखीव असतात
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – मासिक उत्पन्न ₹२५,००० पर्यंत
कमी उत्पन्न गट (LIG) – मासिक उत्पन्न ₹२५,००१ ते ₹५०,०००
मध्यम उत्पन्न गट (MIG) – मासिक उत्पन्न ₹५०,००१ ते ₹७५,०००
उच्च उत्पन्न गट (HIG) – मासिक उत्पन्न ₹७५,००१ पेक्षा जास्त
उदा. (पुणे/मुंबई मधील मागील सोडतींच्या तुलनेत)
EWS घर (२०–२५ चौ.मी.) → ₹८–१२ लाख
LIG घर (२५–४० चौ.मी.) → ₹१५–२५ लाख
MIG घर (४०–६० चौ.मी.) → ₹३०–५० लाख
HIG घर (६० चौ.मी. पेक्षा जास्त) → ₹६० लाख ते १ कोटी (लोकेशननुसार)
मार्केट दरांशी तुलना
मुंबई व पुण्यात बाजारभाव प्रति चौ.फुट ₹८,००० – ₹२५,००० पर्यंत असतो.
म्हाडा घरे साधारण प्रति चौ.फुट ₹४,००० – ₹८,००० या रेंजमध्ये येतात.
म्हणजेच मार्केटच्या तुलनेत म्हाडाची घरे ३०% ते ५०% स्वस्त मिळतात.

