...

इंद्रायणी पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, ५१ जखमी

जिल्हा प्रशासनाची अधिकृत माहिती

मावळ (पुणे), तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा (इंदुरी) परिसरात रविवारी दुपारी साडेतीन वाजता इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून अधिकृत माहिती देण्यात आली. (indrayani nadi pool collapse)

 

indrayani pool collapse update। मावळात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; दोघांचे मृत देह सापडले, अनेक जण बेपत्ता ?

 

३० वर्ष जुना पूल अचानक कोसळला

सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा लोखंडी पूल आजूबाजूच्या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. दुर्घटनेच्या वेळी पावसाळी पर्यटनासाठी १०० ते १२५ पर्यटक पुलावर व परिसरात उपस्थित होते. अचानक पुलाचा काही भाग कोसळल्याने अनेकजण नदीपात्रात अडकले. (indrayani nadi pool collapse)

 

 

‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !

 

तातडीने बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथके, पिंपरी-चिंचवड पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), आपदा मित्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (PMRDA) अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना व वन्यजीव संघटना यांच्या मदतीने शोध व बचावकार्य सुरू आहे.

 

 

जखमींवर उपचार सुरू

जखमींना तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचे काम सुरू आहे.

 

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

या दुर्घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त (पुणे विभाग), संबंधित खासदार, आमदार, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी मावळ, तहसीलदार मावळ आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.

 

पूल उचलण्याचे काम सुरू

कोसळलेला पूल क्रेनच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम सुरू आहे. (indrayani nadi pool collapse)

 

 

आपत्ती नियंत्रण कक्ष संपर्क

कुठलीही तातडीची माहिती अथवा मदतीसाठी खालील आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

टोल फ्री क्रमांक: 1077
दूरध्वनी क्रमांक: 020-26123371, 26133522, 26133523
विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 8975232955
राहुल पोखरकर (आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक): 8888565317

Local ad 1