नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे अपघातात चौघांचा मृत्यू

नांदेड : नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे आज दुपारी 3.50 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.टेम्पो (407) व टाटा मॅजिक यांच्यात समोरासमोर हा अपघात झाला. (4 killed in accident at Sitakhandi mode on Nanded-Bhokar road)

 

 

अपघातात वाहनामधील भुलाबाई गणेश जाधव (वय 45 रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर), संदिप किशनराव किसवे (वय 26, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम (वय 48 रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय 57 रा. पाकीतांडा, ता. भोकर) या चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. (4 killed in accident at Sitakhandi mode on Nanded-Bhokar road)

 

ग्रामीण रुग्णालय भोकरच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका अन्य रुग्णाला नांदेडकडे घेऊन येत असतांना या रुग्णवाहिकेसमोरच हा अपघात घडला आहे. या रुग्णवाहिकेतून अघतातील गंभीर 4 रुग्णांना नांदेड येथे तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

या अपघातात जागेवरच 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठविण्यात आले. इतर चार जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने भोकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेणाऱ्या चार रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे हालविण्यात आले आहे.

Local ad 1