काटकळंबा येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

कंधार : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दर्पण दिन म्हणून पत्रकार दिन काटकळंबा (ता कंधार)  येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी कौठा-बारुळ सर्कल मधील पञकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. (Honoring Journalists on the occasion of Journalists’ Day at Katkalamba)

 

 

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या सुचनेनुसार कंधार भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.  (Honoring Journalists on the occasion of Journalists’ Day at Katkalamba)

 

 

शिवशंकर जाधव, राजेश पावडे, रुक्माजी कोल्हे, प्रभाकर पांडे, आनंद पांचाळ, संघपाल वाघमारे आणि दिगंबर तेलंगे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 

 

 यावेळी भाजपा युवा मोर्चाचे कंधार तालुकाध्यक्ष साईनाथ आप्पा कोळगीरे, उपाध्यक्ष महेश वाघमारे, सरचिटणीस गोविंदराव पाटील वाकोरे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष नवाज सय्यद, शिवराज स्वामी, गंगाराम बस्वदे, माधवराव ऐकाळे, माधवराव चोंडे, समद सय्यद, बालासाहेब शिंदगे, कमलाकर वाघमारे, शिवाजी टोकलवाड, महेबुब पठाण, सचिन हांबर्डे,अदी कार्यक्रर्ते उपस्थित होते.  (Honoring Journalists on the occasion of Journalists’ Day at Katkalamba)
Local ad 1