राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार : कृषीमंत्री दादा भुसे
पुणे : देश व राज्य पातळीवर जीआय मानांकनांना प्रतिष्ठा देण्यासाठी पणन व अपेडाला सोबत घेत कृषी विभाग काम करेल, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी केले. राज्यातील 10 नव्या वाणांना मानांकन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. (GI standards in the state will gain prestige)
साखर संकुल येथे कृषी मंत्री भुसे (Agriculture Minister Dadaj Bhuse) यांनी भौगोलिक मानांकनाबाबत आढावा घेतला. यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार (Agriculture Commissioner Dheeraj Kumar), उपसचिव गणेश पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, पणन संचालक सुनील पवार, संचालक सुभाष नागरे यांच्यासह जीआय मानांकन प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. (GI standards in the state will gain prestige)
भुसे म्हणाले, राज्यातील 22 पिकांना 26 मानांकन मिळाले आहेत. 10 नवीन वाण मानांकनासाठी प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात विकेल ते पिकेल अंतर्गत मागणी असलेला वाण शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. जीआय भौगोलिक मानांकन प्राप्त वाणांना शासनाचे पाठबळ असणार आहे. शेतकरी बांधवांनी सुचविलेल्या काही उपाययोजनावरही लववकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. (GI standards in the state will gain prestige)
जीआय मानांकन मिळालेल्या वाणांचे आता ब्रॅडींग करण्यात येणार आहे. राज्य सरकारने भोगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालेल्या कृषी उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नोंदणी, प्रचार, प्रसिद्धी व बाजारपेठ उपलब्धता अशा चार योजना तयार केल्याने त्याचा फायदा ब्रॅडींगला होणार आहे. राज्यातील अनेकांना भोगोलिक मानांकन मिळाले आहेत. या उत्पादकांच्या अधिक उत्पादनांसाठी, तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये कृषि विभाग, पणन व अपेडा अंतर्गत कृषि उत्पादकांना मदत करण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले. (GI standards in the state will gain prestige)