Winter temperature। राज्यात थंडीचा कडाका वाढला, ओझरचे 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

Winter temperature । महाराष्ट्रात थंडी सुरु झाली असून, मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र (West Maharashtra, North Maharashtra) असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. नाशिक तालुक्यातील निफाड तालुक्यातील ओझरमध्ये (Ozer) आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. (Winter temperature Cold weather has increased in the state) 

 

 

थंडी वाढल्यामुळे लहान मुले शाळेत जाताना उबदार कपडे परिधान करत असल्याचे दिसून येत आहे आणि सकाळी व्यायाम आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (Winter temperature Cold weather has increased in the state)

 

 

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

 

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे निचांकी तापमान आहे. (Winter temperature Cold weather has increased in the state)

 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तापमान सात अंशावरती आले असून, या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्राचा पारा देखील आणखी घसरणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

परभणीतील तापमान 8 अंश सेल्सिअस

दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी मधील आजचे तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. कालचे तापमान 8.3 अंश सेल्सिअस होते. कालपेक्षा आज 3 अंशांनी तापमान घसरले आहे. (Winter temperature Cold weather has increased in the state)

Local ad 1