इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे
पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली तरी शिक्षण पद्धतीत अपेक्षित बदल वेळेवर झाले नाहीत. इंग्रज गेले तरी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेसारखीच इंग्रजी पद्धती देशात कायम राहिली. मात्र, आज नव्या शिक्षण पद्धतीमुळे नवी पिढी घडत आहे आणि शिक्षणाशिवाय गरीबी हटविण्याचा दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तीदिन महोत्सव २०२५ निमित्ताने “मराठवाडा भुषण पुरस्कार” वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्तात्रय मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
Bike Taxi Service in Maharashtra।”Uber, Rapido ला परवाना ; बाईक-टॅक्सीचे दर जाहीर
बागडे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी देखील “इंग्रज गेले पण इंग्रजी वृत्ती देशात टिकून आहे” असा उल्लेख केला होता. निजामशाही काळात मराठवाड्यातील लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले, रझाकारांनी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी मराठवाड्याची संस्कृती आजही तग धरून आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने जाहीर केली व्याज माफी योजना
प्रा. राम शिंदे यांनी भाषणात सांगितले की, मराठवाडा मुक्त झाल्यानंतरही “तो मागास आहे” असे वारंवार म्हटले जात होते. मात्र, आज परिस्थिती बदलली असून मराठवाडा प्रगतीकडे वाटचाल करत आहे. तरुणांनी मोठी स्वप्ने पहावीत आणि मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण ठेवले पाहिजे. पुढील काळात हा पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठवाडी समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे यांनी केले
यंदाचे मराठवाडा भुषण पुरस्काराने सन्मानित मान्यवर
समाजकार्य – हरिश्चंद्र सुळे
पत्रकारिता – राहुल कुलकर्णी
प्रशासकीय सेवा – ओमप्रकाश यादव
शैक्षणिक संस्था – संस्कृती संवर्धन मंडळ
कृषी क्षेत्र – दत्तात्रय जाधव
उद्योजकता – राजेंद्र नारायणपुरे