राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वारातीम विद्यापीठाने कंबर कसली

प्राचार्यांच्या ब्रेन स्ट्रॉमिंग बैठकीत 'रोडमॅप' तयार करण्याचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे आवाहन

 

नांदेड : केंद्र शासनाने तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे अथक परिश्रम घेऊन वेगवेगळ्या बैठका घेत आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी (दि. २३) रोजी विद्यापीठाच्या अधिसभागृहात झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत ‘रोडमॅप’ तयार करून निर्धारित कालावधीत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार राहण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. (srtmun University is committed to implementing the National Education Policy)

 

 

विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राचार्यांची ‘ब्रेन स्ट्रॉमिंग’ बैठक कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे महत्त्व, हे नवीन धोरण विद्यार्थी आणि समाजाच्या उपयोगासाठी कसे आहे, याची माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजावून देण्यात आली. या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी टप्या-टप्याने सुरू झाली असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात हे राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावीपणे राबवण्याचे संकेत कुलगुरू डॉ. भोसले यांनी या बैठकीत दिले. (srtmun University is committed to implementing the National Education Policy)

 

 

शिक्षक, प्राध्यापक यांच्यासोबतच माजी विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा परिसर क्षेत्रातील उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, विद्यार्थी प्रतिनिधी, अभियांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी यांना एकत्र बोलावून त्यांच्या सतत बैठका घेण्याचा प्रयोग कुलगुरूंनी केला आहे. (srtmun University is committed to implementing the National Education Policy)

 

 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून आपल्या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून अभ्यासक्रम कसे विकसित करता येईल, यावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी भर दिला. त्यानंतर या सर्वांकडून आलेल्या सूचनांच्या आधारावर नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश प्राध्यापकांना दिले आहेत.

 

विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राचार्यांना कौशल्यप्रधान शिक्षण यासोबतच शिक्षकांना प्रशिक्षित करणे, आगामी काळात शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल, अभ्यासक्रमात होणारे बदल, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन करावयाच्या विविध उपाययोजना ऑनलाईन टीचिंग, ऑफलाइन टीचिंग, विद्यार्थ्यांच्या क्रेडिटचे एकत्रीकरण यासह अनेक विषयांवर सहविचार सभा व निर्णय अशी बहुआयामी बैठक झाली.

 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांचे गुणांचे खाते ऑनलाइन पद्धतीने काढण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. त्यासाठी विद्यापीठात २०२० पासून सुरू करण्यात आलेला विद्यार्थ्यांचा क्रेडिट सिस्टीमचा डाटा एकत्र करण्यासाठी विद्यापीठ संकेतस्थळावर हायपर लिंक उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा म्हणून विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे अकाउंट तयार करता येणार आहे आणि त्या अकाउंट मधून त्यांचे मार्क्स ऑनलाईन अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. हे क्रेडिट म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक इतिहास असेल. अशी लिंक उपलब्ध करून स्वारातीम विद्यापीठाने या धोरणाच्या अंमलबजावणीत अग्रणी टप्पा पूर्ण केला आहे.

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वी करण्यासाठी होणाऱ्या विविध बैठकांचे प्रभावी नियोजन करून कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे स्वतः मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या समवेतच प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ. एल. एम. वाघमारे, आयक्यूएसी विभागाचे डॉ. डी. डी. पवार यांच्यासह अनेक जण आपली जबाबदारी उचलत परिश्रम करत आहेत. या सर्व तयारीमुळे आगामी काळात नांदेडचे विद्यापीठ नवीन शिक्षण धोरणासाठी महाराष्ट्रात ‘रोड मॉडेल’ म्हणून काम करणारे विद्यापीठ असा नावलौकिक मिळवेल यात शंका नाही, असे मत अनेक प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

Local ad 1