चव्हाण परिवारातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय ? ; श्रीजया चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेत लावली हजेरी

Nanded news : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan) यांच्या परिवारातील तिसरी पिढी म्हणजेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण ह्या राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत श्रीजया यांनी उपस्थिती लावल्याने त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Srijaya Ashok Chavan attended Bharat Jodo Yatra)

 

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया ह्यांना राजकारणातआवड आहे. श्रीजया यांनी मुंबईत एलएलएमचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासाठी 2019 मध्ये जोरदार प्रचार केला आहे.परंतु,त्यावेळी चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जनसंपर्क अभियान, सोशल मीडियासह प्रचाराची धुरा सांभाळली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. (Srijaya Ashok Chavan attended Bharat Jodo Yatra)

 

 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल झाली असून या यात्रेत श्रीजया यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग नोंदवायला. त्यामुळे श्रीजया राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Srijaya Ashok Chavan attended Bharat Jodo Yatra)

 

दरम्यान अशोक चव्हाण यांनी श्रीजया भारत यात्रेत सहभागी झाल्याचा व्हिडिओ ट्विटर वर शेेअर केला आहे. त्यात ते लिहताना म्हणतात…

पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार.

Local ad 1