Pune Crime News : कॅबिनेट मंत्र्याच्या OSD कडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्यात गुन्हा दाखल
मोबाईल चॅटिंगवरून वाद वाढला; पत्नी आणि मुलाला बॅटने मारहाण
Pune Crime News : पुणे :पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाविरोधात (ओएसडी) पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पत्नीसोबतच अल्पवयीन मुलालाही बॅटने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (cabinet minister osd wife assault case pune)
ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात ४० वर्षीय स्वीय सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार आरोपीच्या ३० वर्षीय पत्नीने दिली आहे.
आरोपी मोबाईल वापरतच नव्हता ; मग पोलिसांच्या हाती लागला कसा ? नसरापूर प्रकरणाचा खुलासा ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक (OSD) म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या वेळी तो मोबाईलवर चॅटिंग करत होता. पत्नीने याबाबत विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली.
Nasarapur Crime Case : नसरापूर अत्याचार प्रकरणाची महिला आयोग व बाल हक्क आयोगाकडून गंभीर दखल
तक्रारीनुसार, आरोपीने पत्नी आणि मुलाला बॅटने मारहाण केली तसेच पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून, महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करत आहेत.

