पुणे : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज (Aryans Group of Companies) नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतं. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान म्हणून यावर्षी ग्रुपकडून ‘आर्यन्स सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट व नाटक क्षेत्रातील दर्जेदार कलावंतांचा कौतुक सोहळा या निमित्ताने दरवर्षी आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. (Announcing the honor ceremony for Marathi artists on behalf of Aryans Group)