Ajit Pawar Pune Manifesto 2025 | “मोफत मेट्रो, रोज पाणी, 200 क्लिनिक! अजित पवारांचा पुण्यासाठी ‘मेगाप्लॅन’
Ajit Pawar Pune Manifesto 2025 | पुणे | 10 जानेवारी 2025 : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी दाखवत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुणेकरांसमोर पक्षाचा महत्त्वाकांक्षी जाहीरनामा सादर केला. “अष्टसूत्री प्रगती” आणि “अष्टावधानी नेतृत्व” या दोन आधारस्तंभांवर उभा असलेला हा जाहीरनामा पुण्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मानला जात आहे. सहा महिन्यांच्या सर्वेक्षणातून, प्रभागनिहाय नागरिक संवादातून आणि जनतेच्या थेट अपेक्षांमधून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पुणेकरांना फक्त घोषणा नकोत, तर वेळेत अंमलबजावणी हवी आहे, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचे अजित पवारांनी सांगितले.
पुणेकरांसाठी दररोज पाणी – टँकरला रामराम
प्रत्येक प्रभागात नियोजित वेळेत आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा, पाईपलाईन गळती थांबवणे आणि भामा-मुळा-मुठा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी आणण्याचा स्पष्ट आराखडा जाहीरनाम्यात देण्यात आला आहे. यामुळे टँकरवर अवलंबित्व संपणार आहे.
“12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 12 जानेवारीपासून HSC Hall Ticket ऑनलाईन – लगेच तपासा”
वाहतूक कोंडीवर थेट घाव
अपूर्ण लिंक रोड, खड्डेमुक्त रस्ते, 150 किमी मुख्य रस्त्यांचे दर्जावर्धन आणि HCMT (हाय कॅपॅसिटी मेट्रो ट्रान्झिट रूट) ची अंमलबजावणी करून पुणे ट्रॅफिक-मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
2029 पर्यंत पुणे ‘टॉप-3 स्वच्छ शहरांमध्ये’
100% कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, हरित सोसायट्या आणि अपयशी प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करून पुण्याला देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांमध्ये नेण्याचा संकल्प आहे.
200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’ – गरीबांसाठी मोफत उपचार
शहरात 200 आधुनिक क्लिनिक, PPP पद्धतीने तपासण्या, टेलिमेडिसिन आणि आर्थिक सहाय्यामुळे पुणेकरांना खिशाला न लागणारी आरोग्यसेवा मिळणार आहे.
प्रदूषणमुक्त पुण्याचा रोडमॅप
पूर नियंत्रण, ड्रेनेज, नाल्यांचे संरक्षण, वृक्षलागवड आणि हवामान बदलास तयार शहर उभारण्याचा पर्यावरणीय विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्यांच्या मूळ जागेवरच, पारदर्शी प्रक्रिया आणि उपजीविकेची हमी देऊन करण्यात येणार आहे.
पुणेकरांसाठी मोठा दिलासा – मोफत मेट्रो व बस
मोफत मेट्रो व पीएमटी बस सेवा, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट आणि व्याजमुक्त कर्जाची तरतूद करण्यात आली आहे.
‘पुणे मॉडेल शाळा’
150 आधुनिक शाळा, CBSE-ICSE दर्जाचे शिक्षण, मराठी माध्यमावर आधारित इंग्रजी शिक्षण, क्रीडा व विज्ञान सुविधा – पालकांवर कोणताही अतिरिक्त भार नाही. अजित पवारांनी हा जाहीरनामा सादर करताना सांगितले, “पाच काम, पक्का वादा करू काम तीन जादा!”. म्हणजे आश्वासनांपेक्षा जास्त काम करून दाखवणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख असेल.
❓ FAQ – प्रश्न उत्तर
Q1. अजित पवारांच्या जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी काय खास आहे?
मोफत मेट्रो-बस, रोज पाणीपुरवठा, 200 क्लिनिक, टॉप दर्जाच्या शाळा आणि ट्रॅफिक-मुक्त पुणे.
Q2. मोफत मेट्रो आणि बस सेवा कधीपासून मिळेल?
महापालिकेत सत्ता आल्यानंतर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल.
Q3. पुण्याच्या पाणी समस्येवर काय उपाय?
भामा-मुळा-मुठा प्रकल्पातून अतिरिक्त पाणी, गळती बंद आणि वेळापत्रकानुसार पुरवठा.
Q4. गरीब नागरिकांसाठी आरोग्य सेवा कशी असेल?
200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, मोफत व स्वस्त तपासण्या आणि आर्थिक मदत.
Q5. शाळांबाबत काय घोषणा आहेत?
150 आधुनिक ‘पुणे मॉडेल शाळा’ – CBSE/ICSE दर्जाचे शिक्षण, पालकांवर खर्च नाही.

