पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक तोंडावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा म्हणजे निवडणुकीपुरती फसवी लालूच असून पुणेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार टीका केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. (murlihar mohol criticism ncp free metro pmpml pune)
मोहोळ म्हणाले की, पुणे शहरात यापूर्वी ‘मोफत सेवा’च्या घोषणांचा अनुभव पाहिला आहे. बीआरटी सेवेच्या उद्घाटनावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने एक महिना मोफत सेवा देण्याची घोषणा केली होती. मात्र काही दिवसांतच ही घोषणा मागे घ्यावी लागली. ३० ऑगस्ट २०१५ रोजी अजित पवार यांनीच मोफत सेवा अव्यवहार्य असल्याचे मान्य करून अवघ्या चार दिवसांत ती बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
“आज पुन्हा अजित पवार मेट्रो आणि पीएमपीएमएल मोफत करण्याची घोषणा करत आहेत. हा इतिहास पाहता ही केवळ निवडणुकीसाठीचा जुमला असून पुणेकरांची सरळसरळ फसवणूक आहे,” असा आरोप मोहोळ यांनी केला. या घोषणांमागे कोणतीही आर्थिक तरतूद, व्यवस्थापन आराखडा किंवा सेवेच्या दर्जावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेवर येणारा आर्थिक बोजा, तिकीट महसूल आणि सेवेच्या टिकावाबाबत राष्ट्रवादीने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
“महापालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादीकडून अशा प्रकारच्या लोकलुभावन घोषणा केल्या जात आहेत. पुणेकरांनी या जुमल्याला बळी पडू नये,” असे आवाहनही मोहोळ यांनी केले.
❓ **FAQ (प्रश्न-उत्तर)
Q1. राष्ट्रवादीने पुण्यासाठी कोणती घोषणा केली आहे?
➡️ मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा मोफत करण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे.
Q2. मुरलीधर मोहोळ यांनी या घोषणांवर काय प्रतिक्रिया दिली?
➡️ त्यांनी या घोषणांना ‘चुनावी जुमला’ म्हणत पुणेकरांची फसवणूक असल्याचा आरोप केला.
Q3. बीआरटी मोफत सेवेचा संदर्भ का दिला गेला?
➡️ कारण २०१५ मध्ये बीआरटी मोफत सेवा अवघ्या चार दिवसांत बंद करावी लागली होती, त्यामुळे अशा घोषणांची विश्वासार्हता नाही.
Q4. मोहोळ यांच्या मते या घोषणांचा धोका काय आहे?
➡️ आर्थिक बोजा वाढणे, सेवा व्यवस्थापन बिघडणे आणि दर्जा खालावण्याचा धोका.
Q5. ही टीका कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे?
➡️ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.

