गुंठेवारीत बांधलेले घर होणार नियमित, पण भरावे लागेल शुल्क
भूखंड नियमित करा अन्यथा 31 मार्च नतंर बांधकामे होणार जमीनदोस्त
नांदेड : शहरालगत आणि ग्रमीण भागात गुंठवारीने जमिन खरेदी करुन घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे नियमित करुन घेण्याची संधी दिली असून, 31 मार्च पुर्वी ही बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी अर्ज आवश्यक आहे. अर्ज केल्यास ही बांधकामे 31 मार्चनंतर जमीनदोस्त केले जातील, असा इशारा प्रशानाकडून देण्यात आला आहे. (The house will be regularized in Gunthewari, but a fee will have to be paid)
नवीन अधिनियमनानुसार गुंठेवारी पद्धतीत अडकलेल्या लोकांना आपल्या घर, प्लॉटच्या नियमाधीन, श्रेणीवाढ, करण्याच्यादृष्टिने प्रशासन पातळीवरील प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यादृष्टिने आज दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे महसूल, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, वास्तुस्थापत्य, नगरपरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, सहाय्यक नगर रचनाकार नजरूल शेख, जिल्हा उपनिबंधक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी मुदतवाढ
ज्या लोकांनी अनाधिकृतपणे अकृषिक वापर करून नगररचनाकार यांची लेआऊटला मान्यता न घेता भूखंड पाडले व यावर इमारत बांधलेल्या भूखंडधारकांनी गुंठेवारीसाठी 31 मार्च 2022 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. जे अर्ज करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध नियमाप्रमाणे बांधकाम पाडणे व इतर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (The house will be regularized in Gunthewari, but a fee will have to be paid)
जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर म्हणतायेत..
अधिकचे शुल्क घेतल्यास होणार कारवाई…
ही प्रक्रिया सुलभ व्हावी यादृष्टीने नगररचना विभागाकडे नोंदणीकृत अभियंता यांच्यामार्फत आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधितांनी तालुका पातळीवर तहसिल कार्यालयात तर मनपा हद्दीतीतील संबंधितांनी गुंठेवारी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावायाचा आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वास्तुस्थापत्य अभियंते यांना शासनाने निर्देश दिलेल्या मर्यादेतच शुल्क घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक पैसे घेता येणार नाहीत. अधिकची जर कोणी मागणी करीत असेल तर संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. (The house will be regularized in Gunthewari, but a fee will have to be paid)

