ओप्पो F35 Pro 5G आणि F35 5G लाँच; फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’ संकल्पनेसह भारतात १० वर्षांचा प्रवास ; ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा
पुणे : स्मार्टफोन उत्पादक ओप्पोने भारतातील F सीरिजच्या दशकपूर्तीनिमित्त OPPO F35 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये OPPO F35 Pro 5G आणि OPPO F35 5G या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आणि १०० अंशांचे फील्ड ऑफ व्ह्यू हे या स्मार्टफोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे ग्रुप सेल्फीमध्ये अधिक व्यक्ती आणि आजूबाजूचा परिसर एकाच फ्रेममध्ये टिपता येणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, भारतात गेल्या १० वर्षांत F सीरिजच्या तीन कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे. सुरुवातीच्या ‘सेल्फी एक्सपर्ट’ संकल्पनेपासून ‘ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’पर्यंत सीरिजचा प्रवास झाला आहे.
३८,९९९ रुपयांपासून किंमत
OPPO F35 Pro 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ४५,९९९ रुपये, ८ जीबी रॅम व १२८ जीबी मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम व २५६ जीबी मॉडेलची किंमत ५४,९९९ रुपये आहे. OPPO F35 5G च्या ६ जीबी रॅम व १२८ जीबी मॉडेलची किंमत ३८,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी मॉडेलची किंमत ४२,९९९ रुपये आहे.हे स्मार्टफोन प्रमुख रिटेल स्टोअर्स, ओप्पो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर १० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज बोनस आणि झिरो डाउन पेमेंटचे पर्यायही देण्यात आले आहेत.
८,००० एमएएचची बॅटरी
दोन्ही मॉडेल्समध्ये ८,००० एमएएचची बॅटरी आणि ८० वॅट SUPERVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बॅटरीची क्षमता १,८०० चार्जिंग सायकलनंतरही ८० टक्क्यांपेक्षा अधिक राहू शकते. स्मार्टफोनमध्ये IP66, IP68, IP69 आणि IP69K दर्जाचे वॉटर व डस्ट रेझिस्टन्स तसेच मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स देण्यात आले आहे.
OPPO F35 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7360 MAX प्रोसेसर, १७.२२ सेंटीमीटरची 1.5K रिझोल्यूशन असलेली १४४ हर्ट्झ AMOLED डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आहे. यामध्ये ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यांद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.
OPPO F35 5G मध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि १०० अंशांच्या फील्ड ऑफ व्ह्यूसह ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये १६.६९ सेंटीमीटरची FHD+ १२० हर्ट्झ AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन ColorOS 16 वर कार्यरत असून त्यामध्ये AI आधारित विविध सुविधा उपलब्ध आहेत.
ओप्पो इंडियाचे कम्युनिकेशन्स प्रमुख गोल्डी पटनायक यांनी सांगितले की, F35 सीरिजच्या माध्यमातून कंपनीने सेल्फी फोटोग्राफीचा अनुभव अधिक व्यापक करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रातील कुटुंबे, सण-उत्सव आणि सामूहिक सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रुप सेल्फीची संकल्पना ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
महाराष्ट्रात ५९ सर्व्हिस सेंटर
महाराष्ट्रात ओप्पोची ५९ एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर आहेत. देशभरात ५०० पेक्षा अधिक शहरांमध्ये कंपनीची ६२० हून अधिक सर्व्हिस सेंटर असून १९ भाषांमध्ये ग्राहकांना सेवा दिली जाते. २०२६ मध्ये देशभरात १५० हून अधिक नवीन Service Center 3.0 Pro केंद्रे सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

