Maharashtra MLC Election 2026 । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

Maharashtra MLC Election 2026 । पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.

 

 

काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिली आहे.

 

सिप्ला फार्माला मोठा दणका ; पुण्यातील औषध विक्री-वितरण परवाना रद्द

 

पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 2020 च्या निवडणुकीत आसगावकर विजयी झाले होते.

 

दरम्यान, महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

काँग्रेसचे उमेदवार

  • नागपूर विभाग पदवीधर — अभिजित गोविंदराव वंजारी
  • पुणे विभाग शिक्षक — जयंत दिनकर आसगावकर
  • अमरावती विभाग शिक्षक — प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे

 

 

Local ad 1