...

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल ८९.७९ टक्के; कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी कायम

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे.

 

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :

* results.digilocker.gov.in

* mahahsscboard.in

* hscresult.mkcl.org

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल आज, शनिवार २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात

 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

 

विद्यार्थ्यांना निकालाचा प्रिंटआऊट काढण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच DigiLocker App वर डिजिटल मार्कशीट सुरक्षित ठेवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय mahahsscboard.in संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालय लॉगिनद्वारे सामूहिक निकालही पाहता येणार आहे.

 

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांच्या गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्यासाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.

 

अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर ५ कामकाजाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :

* results.digilocker.gov.in

* mahahsscboard.in

* hscresult.mkcl.org

 

 

 

 

 

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले, तर १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

 

 

खाजगी विद्यार्थ्यांमध्ये एकूण ३७,५५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.२१ टक्के नोंदवली गेली.

 

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये एकूण ५०,८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३६.४४ टक्के लागला.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये एकूण ८,४४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असून ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९०.५८ टक्के इतका लागला आहे. पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमांनुसार सवलतीचे गुणही देण्यात आले.

 

यंदाही मुलींनी निकालात आघाडी कायम राखली आहे. नियमित विद्यार्थ्यांमध्ये मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के, तर मुलांची ८६.८० टक्के आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी अधिक आहे.

 

विभागनिहाय निकालात कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी राहिला आहे.

 

राज्यातील एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मागील काही वर्षांच्या निकालाचा विचार केला असता, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बारावीचा निकाल ९१.८८ टक्के होता. यंदा तो ८९.७९ टक्क्यांवर आला असून, निकालात घट दिसून आली आहे.बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असून विद्यार्थी ऑनलाइन गुणपत्रिका पाहू शकतात. तसेच DigiLocker वर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Local ad 1