...

जिल्हा परिषद सदस्यांची विकासात्मक दृष्टी ग्रामविकासाला देईल नवी चालना : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

zp member training workshop। पुणे : ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका अत्यंत कळीची आहे. सदस्यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम केल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या तीन दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत

 

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान आणि राज्य ग्रामीण विकास संस्था (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात खालील जिल्ह्यांतील ८५ सदस्य सहभागी झाले होते. त्यात छत्रपती संभाजीनगर,परभणी , धाराशीव,लातूर आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

 

zp member training workshop
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रशिक्षण हा मैलाचा दगड ठरेल. जिल्हा परिषदेत प्रभावीपणे काम करण्यासाठी सदस्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात शाश्वत विकासासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत सक्षमीकरण अभियानाला’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सदस्याने सक्रिय सहभाग नोंदवावा.

 

पुण्यात भाजपच्या विजयामागचं ‘गुपित’ काय? खासदार संजय राऊतांनी केलं उघड !

 

 

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, शेखर गायकवाड, गजानन पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

Local ad 1