आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, पुण्यातील रुबी हाॅल येथे उपचार सुरु

पुणे : भाजपचे मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांच्या कारला पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुबी हाॅल रुग्णालयात (Ruby Hall Hospital, Pune)उपचार सुरु आहेत.  या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत. गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (MLA Jayakumar Gore’s car met with an accident)

सातारा येथील फलटणच्या मलठण येथे पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून गाडी जात होती. त्याचवेळी चालकाचे फॉर्च्युनर वरील नियंत्रण सुटल्याने कार 30 फूट खोल खड्ड्यात पडली. या कारमधून जयकुमार गोरे यांच्यासह चौघेजण प्रवास करत होते. (MLA Jayakumar Gore’s car met with an accident)

 

, MLA Jaykumar Gore accident
, MLA Jaykumar Gore accident

 

या अपघातात जयकुमार गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना उपचारासाठी बारामतीला नेण्यात आले.  त्यानंतर जखमींना अधिक उपचारासाठी पुण्यातील रुबी हाॅल येथे नेण्यात आले. (MLA Jayakumar Gore’s car met with an accident)

Local ad 1