...

Pune Grand Challenge Tour 2026 : पुणे शहरातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुटी

Pune Grand Challenge Tour 2026 पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांचे आयोजन दि. १९ ते २३ जानेवारीदरम्यान पुणे जिल्ह्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत साेमवारी (दि. १९) पुणे शहरात *प्रोलॉग रेस* होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे. (pune-grand-challenge-tour-2026-school-college-holiday-traffic-update)

 

Pune Grand Challenge Tour 2026 । सोमवारी पुण्यात बाहेर पडताय ? आधी ही बातमी वाचा… ८ प्रमुख भागात वाहतूक बंद

 

प्रोलॉग रेसमुळे फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड), गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच त्यांना जोडणारे उपरस्ते साेमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने शैक्षणिक संस्थांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

रेल्वेचा निर्णय की अन्याय? : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमधील प्रवाशांची होणार मोठी गैरसोय !

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले-पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, महापालिका शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र तसेच व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना साेमवारी सुटी देण्यात आली आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागांना दिले आहेत.

 

 

 

 

 

Local ad 1