...

ओंकार कदमवर अखेर गुन्हा दाखल | PMC महिला डॉक्टर छळ प्रकरणात पोलिसांची कारवाई

ओंकार कदम आणि अक्षय कांबळेवर महापालिकेत प्रवेश बंदी

पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अखेर पुणे शहर भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांवर राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असल्याचा आरोप होत होता. (omkar kadam fir pmc doctor harassment 2025)

 

Mhada Lottery 2025 Pune : परवडणाऱ्या सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे या दोघांसह त्यांच्या साथीदारांवर PMC कार्यालयात प्रवेश बंदी लागू केली होती. महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर विशाखा समितीने अहवाल दिला होता आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, मात्र कारवाईला विलंब होत होता, अखेर कदम आणि कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी 2025 ते 17 जून 2025 दरम्यान, ओंकार कदम व अक्षय कांबळे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागात येऊन, महिला अधिकाऱ्याला अपमानित करणारे वक्तव्य केले. अश्लील भाषेचा वापर केला. अनधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले,कार्यालयात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
तक्रारीनुसार, हे सर्व प्रकार महिला अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा व मानसिक आरोग्य धोक्यात आणणारे होते. त्यामुळे या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 78, 79, 126(2), 189(2), आणि 351(2) नुसार गुन्हा क्रमांक 93/35 दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Local ad 1