‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे. पुणे जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवण्यासाठी ‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्कूल व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोहे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (pune zilha parishad shikshan model 2025)
une zilla parishad nivadnuk 2025। पुणे जिल्ह्यात नवीन गट-गणरचना जाहीर : ७३ गट, १४६ गण निश्चित
शिक्षण क्षेत्रात प्रगती
पुणे जिल्ह्यातील 3546 शाळांपैकी 303 शाळांना मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विविध पायाभूत सुविधा व उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
-
STEM Lab, डिजिटल क्लासरूम्स, 21st Century Skills, व्होकेशनल लॅब, परदेशी भाषा शिक्षण, संगणक लॅब, ग्रंथालय यांची निर्मिती.
-
काही शाळांची नव्याने इमारत बांधणी, काहींमध्ये नवीन वर्गखोल्या, तर काही वर्गखोल्यांचे नूतनीकरण.
-
शिक्षकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण.
-
शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवली जाणार.
-
विद्यार्थ्यांना ISRO व NASA भेटीचा लाभ.
महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !
आरोग्य क्षेत्रात बदल
जिल्ह्यातील 108 प्राथमिक आरोग्य केंद्रे मॉडेल PHCमध्ये रूपांतरित केली जात आहेत. यातील 35 केंद्रांमध्ये NHM व NSQF मानदंडानुसार सुधारणा करण्यात येणार आहे.
-
मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, IPD वॉर्डस, पॅथोलॉजी लॅब सुधारित केले जातील.
-
34 केंद्रांची दुरुस्ती व 5 नव्या इमारतींचे बांधकाम.
-
सर्व PHC मध्ये Selco कंपनीमार्फत सौर ऊर्जेची व्यवस्था.
-
BOSCH कंपनीमार्फत 5 PHC साठी वैद्यकीय उपकरणांची पूर्तता.
-
Bharat Forge कंपनीकडून होळ येथील PHC चे बांधकाम.
पुरस्कार वितरण
2023-24 या वर्षातील 26 उत्कृष्ट शिक्षक व 2 केंद्रप्रमुख यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच 10 शाळांना अध्यक्ष चषक आणि 6 शाळांना ‘माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कार देण्यात आले.
“पुणे जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील ‘या’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू जनतेला दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरेल,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी आपल्या भाषणात केले.
CSR सहभाग
गुंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनने दोन अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला प्रदान केल्या. तसेच 14 CSR कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करा – अजीत पवार
बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची गरज आहे, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे. राज्यात विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?
शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरीता राज्य शासनाचा पुढाकार
पवार म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने अंगणवाडी पासून पदव्युत्तर शिक्षणाकरीता १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या खोल्या उभारण्याकरीता अग्रक्रम देण्यात येत आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सुविधांनीयुक्त उत्कृष्ट ‘शालेय शिक्षण भवन’ उभारण्यात येत असून लवकर त्याचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्यावतीने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत मोठया प्रमाणात निधी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे, याकरीता विविध सामाजिक संस्था, विविध कंपन्या प्रतिसाद देत आहेत.
सरपंच आणि ग्रामपंचायतीने गावातील शिक्षणाची जबाबदारी घ्यावी
शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी ओळखून गावातील शिक्षणाची जबाबदारी घेऊन शिक्षण लोकचळवळ झाली पाहिजे. ग्रामसभेत शाळा कामकाजाचा आढावा घ्यावा, प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. उच्च् पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी विद्यार्थी या नात्याने शाळेला मदत केली पाहिजे. शाळेचा दर्जा सुधारण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता, दर्जा वाढीसोबतच आवश्यकतेप्रमाणे बदल केले पाहिजे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असून याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.
शिक्षणामुळे जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्याचे कार्य
नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित नागरिक देशाच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार, विचार, उच्चार हे विकसित होत असतात. शिक्षणामुळे पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते, सुसंस्कृत समाज घडतो, शिक्षण मानवाला विचार करण्याची ताकद देते, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते तसेच जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्यासोबतच आपले हक्क व कर्तव्य व जबाबदारीची जाणीवही होते. आपला देश, समाज सुखी, समृद्ध, सुसंस्कृत घडविण्यासाठी शिक्षण हाच उत्तम पर्याय आहे म्हणून शिक्षणाकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे, यासर्व गोष्टींचा विचार करता राज्यशासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शिक्षणाची चळवळ उभी केली असून ही चळचळ अधिक मजबूत करण्याकरीता समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिकतेची जोड देण्याकरीता पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने 3 हजार 456 शाळांमध्ये ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमामुळे आरोग्य सेवेला डिजीटल, स्वयंपूर्ण, सर्वसमावेशक करण्यासोबतच सर्व सुविधांनीयुक्त ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील. आगामी काळात पुणे मॉडेल शाळा, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही उपक्रमामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडविण्यास उपयोगी ठरतील, त्यामुळे हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, सामजिक संस्था, नागरिकांनी योग्य समन्वय राखून काम करावे. याकामी शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांना सक्षम करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आपली जबाबदारी आहे. आगामी काळात राज्यशासनाच्यावतीने ‘पुणे मॉडेल शाळा’ आणि ‘मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रम राज्यभर राबविण्याबाबत विचार करण्यात येईल, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल, असेही पवार म्हणाले.