पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन

  • पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.भगवान पवार यांची काही ऑक्टोबरमध्ये बदली करण्यात आली होती. ही बदली अवघ्या चार महिन्यांत होत असल्याचे कारण देत त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मात्र मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हाण दिल्यामुळे काही महिन्यांपासून पवार यांनी ज्या ठिकाणी सेवा केली आहे. त्या सर्व ठिकाणी चौकशी करण्यात आली. यासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. यापथकाने चौकशी करुन पवार यांच्याविरोधात एक अहवाल शासनाला दिला त्यानुसार निलंबन करण्यात आले आहे.

 

 

पुणे जिल्हा परिषदेमध्ये डॉ.पवार जिल्हा आऱोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना एका महिला कर्मचार्‍याने त्यांच्या विरोधा तक्रार केली होती. आरोग्य खात्यामध्ये साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासर्व प्रकरणाची  एप्रिल महिन्यामध्ये चौकशी करण्यासाठी मोठी समिती नेमण्यात आली. यासमितीने आरोग्य विभागाला अहवाल दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

मंत्र्यांशी खटके उड्यालाने निलंबन

महापालिकेच्या सेवेत आल्यानंतर आरोग्यमंत्री आणि पवार यांच्यात खटके उडाले. त्यामुळे चार महिन्यामध्येच डॉ. पवार यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. पवार यांनी  मॅटमध्ये जावून पुन्हा महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी राहण्याचे आदेश मॅटने दिला. त्यामुळे आरोग्य खात्यामधील वरीष्ठांची मर्जी डावल्याने जुनी प्रकरणे काढून निलंबन करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

थेट नंदुरबार मुख्यालय…

       कोणत्याही कारणाने निलंबित केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालय हे सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीच दिले जाते. तसेच तेथील प्रमुखांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येत नाही. परंतु, डॉ. भगवान पवार यांचे मुख्यालय नंदुबार जिल्हारुग्णालय देण्यात आले आहे. त्यामुळे यातून जाणूनबुजून त्रास देण्यासाठीच असे केले असावे, अशी चर्चा होत आहे.

Local ad 1