...

Zilla Parishad, Panchayat Samiti elections : जिल्हा परिषद गट आणि गणाचे आराखडे तालुक्यावर मिळतील पाहायला

जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना

Zilla Parishad, Panchayat Samiti elections नांदेड :  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना गुरुवारी  (दिनांक 2 जून) प्रसिद्ध करण्यात येत आहे.

आदेशाच्या मसुदाची प्रत ही जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव खै, लोहा, कंधार, मुखेड, व देगलूर येथील तहसिलदार कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध केले जात आहे.

आदेशाच्या मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्या संदर्भात सकारण लेखी निवेदने/ हरकती/ सूचना तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे 8 जूनपर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली निवेदने/हरकती/सूचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी कळविले आहे.

Local ad 1