Transfers of IPS officers । राज्यातील 26 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Transfers of IPS officers । मुंबई. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे.आठवड्याभरापूर्वी सहा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर तीन दिवसांपूर्वी राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी 26 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या आहेत. (Transfers of IPS officers in the state)
तीन दिवसांपूर्वी राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. यात रविंद्र शिसवे -Ravindra Shisve (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग), शारदा निकम (विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स), निस्सार तांबोळी – Nisar Tamboli (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल), एन डी रेड्डी (पोलीस सहआयुक्त, नागपूर), सुप्रिया पाटील-यादव (विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना), राजीव जैन (विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा), अभिषेक त्रिमुखे (विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन) आणि आरती सिंह (IPS Aarti Singh) यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते.
26 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
1. अनिल पारसकर – अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई.
2. शैलेश बलकवडे – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
3. एम. रामकुमार – संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे (पद अवनत करून)
4. शशीकुमार मीना – अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
5. प्रवीण पाटील – अपर पोलीस आयुक्त, नागपूर
6. संजय बी. पाटील – अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
7. वसंत परदेशी- अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर
8. एस.डी. आव्हाड – अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
9. एस. टी. राठोड – पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
10. पी.पी. शेवाळे – पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, बृहन्मुंबई
11. ए.एच. चावरिया – पोलीस आयुक्त, अमरावती शहर (पद अवनत करून)
12. विनिता साहु – अपर पोलीस आयुक्त, सशस्र पोलीस दल, बृहन्मुंबई
13. पंकज देशमुख – पुणे अपर पोलीस आयुक्त
14. प्रसाद अक्कनवरु – पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, बृहन्मुंबई
15. अमोघ गावकर – पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे
16. जी. श्रीधर – पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
17. मोक्षदा पाटील – पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल
18. राकेश कलासागर – पोलीस आयुक्त, लोहमार्ग, बृहन्मुंबई
19. प्रियंका नारनवरे – अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
20. अरविंद साळवे – सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक
21. सुरेश कुमार मेंगडे – मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई
22. धनंजय कुलकर्णी – अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई
23. विजय मगर – रा र पोलीस उप महानिरीक्षक
24. राजेश बनसोडे – अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
25. विक्रम देशमाने – अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
26. राजेंद्र दाभाडे – अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर