पुणे, ‘‘मी सर्वच राजकीय पक्ष घराण्यांच्या जवळ आहे. ही माझे वडील गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आहे. मात्र आता कोणी एकत्र यावे न यावे याबाबत मी कोणाला सल्ला देण्या एवढे माझे वय नाही. मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही. सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा आहे. असे मत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Animal Husbandry Minister Pankaja Munde) यांनी राज्यातील पवार ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या घडामोडीवर व्यक्त केले. (Transfers through counseling of officials of the Animal Husbandry Department)

