Pune Crime । पुण्यात बोगस आयएएस अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात !

Pune Crime । पुणे : औंध येथे एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात स्वतःला सनदी अधिकारी (IAS Officer) म्हणून मिरवणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या (Crime Branch Unit One) पथकाने तळेगाव (Talegaon News) येथून राहत्या घरातून अटक केली. त्याच्या विरुद्ध चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The Secretary in the Prime Minister’s Office turned out to be a fraud)

 

 

वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 रा. प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तेळेगाव दाभाडे, पुणे.), असे अटक केलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्याने स्वतःला नाव डाॅ. विनय देव (Dr. Vinay Dev) असून, मी पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर (Secretary in the Prime Minister’s Office) असून, गोपनिय काम करीत असल्याचा दावा केला होता. कार्यक्रमाच्या आयोजकांना त्याच्यावर संशय आल्याने, त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याचे बिंग फुटले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता बंगला नं. 351, सिंध हाैसिंग साेसायटी, औंध येथे पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातजम्मु-काश्मीर येथे रुग्णवाहिकी भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विरेन शहा, सुहास कदम, पी.के. गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य असे हजर हाेते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेला वासुदेव तायडेने स्वतःची ओळख डाॅ. विनय देव अशी करुन देत आयएएस या पदावर असून, सध्या ते दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या एकंदरीत देहबोलीवरुन त्याच्यावर उपस्थितांना संशय आला.

 

 

पोलिसांना माहिती दिल्यानंतर तायडे याचा 30 मे राेजी पोलिसांनी शोध घेतला. तो तळेगाव दाभाडे येथील रानवारा राे हाऊसमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्याला घरातुन ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्याने वासुदेव निवृत्ती तायडे असल्याचे सांगितले. विरुध्द सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 419,170 अन्वये (Under section 419,170 of the IPC) चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे (Chatursrungi Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The Secretary in the Prime Minister’s Office turned out to be a fraud)

 

 

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार पोलीस (Commissioner of Police Ritesh Kumar Police), सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलिस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.

Local ad 1