Pune Crime | अमंलीपदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गजाअड ; लष्कर पोलिसांची कारवाई
Pune Crime | पुणे : कॅम्प परिसरात लष्कर पोलिस (Army police) रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना नायजेरियन नागरीक संशयित रित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी हटकले असता, तो घाबरला पाळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला थांबवून पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी तो उडवा-उडवीचे उत्तरे देऊन सूटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्याची अधिक चौकशी केली. त्यात तो अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. (Nigerian drug dealer arrested; Army police action)
चिकवु जेकवु रेऊबेन (CHUKWU JEKWU REUBEN) (वय-३६ वर्षे, रा. मुळ रा. मकुरडी, नायजेरीया सध्या रा. नालासोपारा जि. ठाणे व मोहम्मद मुसावी महामुद मुसावी (वय ३८ वर्षे, रा.९५१ न्यु नाना पेठ, पदमजी पार्क, पुणे), असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. (Nigerian drug dealer arrested ; Army police action)
Related Posts