Talathi Recruitment Exam 2023। तलाठी पदासाठी अर्ज केला आहे, तर ही बातमी मीस करु नका !

परिक्षेच्या तारखा जाहीर

Talathi Recruitment Exam 2023 । पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर दरम्यान, होणार अशी माहिती सुत्रांनी दिली. (Talathi Recruitment Exam 2023. Exam dates announced)

 

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी (Examination will be held for 4466 posts of Talathi post across the state) ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

 

उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा केंद्र अगोदर समजणार असून, परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिली जाणार आहे.,

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेतली जात आहे.

– आनंद रायते, अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक

दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

 

असे आहेत परीक्षेचे टप्पे ?

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

 

खालील तारखांना होणार नाहीत परिक्षा

  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.

 

 

Local ad 1