Talathi Posts in Pune District । पुणे जिल्ह्यात 383 तलाठी पदांसाठी होणार भरती

Talathi Posts in Pune District । पुणे : पुणे शहर हे स्पर्धा परिक्षेचे माहेरघर म्हणून पाहिले जाते. त्यातच राज्यात सर्वत्र एकच प्रश्न पत्रिका असल्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आली असून, तलाठी भरती होणार आहे. राज्यात सुमारे 4 हजार 464 तलाठ्यांच्या पदांची भरती केली जाणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यात तब्बल 383 पदांसाठी भरती होणार आहे. (383 Talathi posts will be recruited in Pune district)

 

 

 

तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले असून, त्यात राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, ती भरली जाणार आहेत. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने (Jamabandi and Land Records Department) येत्या 20 जून पासून भरतीसाठी लिंक खुली करण्याकरिता राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरता येतील.

 

Talathi Recruitment 2023 । तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट ; परिक्षा कधी होणार ?

 

पुणे जिल्ह्यात 383 पदे रिक्त असून, त्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. टीसीएस कंपनी घेणार परिक्षा आजपर्यंत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. (TCS company will conduct exam) तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रम निश्चित केला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. भरती परीक्षा करता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी (The link will open to apply online) करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असेल. 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

Local ad 1