...

कोण आहेत पुण्याचे ‘हायएस्ट एज्युकेटेड’ उमेदवार सनी निम्हण?

परदेशी शिक्षण, स्वतः फेडलेले कर्ज आणि थेट मैदानात !

 

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारे ते एक आश्वासक नेतृत्व मानले जात आहे. औंध–बोपोडी प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना असून, यंदा ते प्रभाग क्रमांक ८ – औंध-बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. (sunny vinayak nimhan highly educated corporator pune)

 

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचा सामाजिक व राजकीय वारसा लाभलेल्या सनी निम्हण यांनी सुरुवातीपासूनच अभ्यास, क्रीडा आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे शालेय शिक्षण एस.एस.पी.एम.एस. आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी एमआयटी, पुणे येथून बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पूर्ण केले.

 

‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर

 

 

उच्च शिक्षणासाठी सनी निम्हण यांना ऑस्ट्रेलियातील जागतिक कीर्तीच्या मेलबर्न विद्यापीठात ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’ या विषयात एम.एस. करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, हे शिक्षण त्यांनी शिष्यवृत्तीच्या सहाय्याने पूर्ण केले. राज्यातील मान्यवर राजकीय व्यक्तिमत्त्व असूनही, वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी मुलामध्ये आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने परदेशी शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असताना सनी निम्हण यांनी दैनंदिन खर्चासाठी दररोज चार तास काम करत शिक्षण पूर्ण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण शैक्षणिक कर्ज स्वतः फेडून जबाबदारीची प्रगल्भता दाखवून दिली.

 

आज सनी विनायक निम्हण हे पुण्यातील प्रभावी तरुण नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. औंध परिसराचे नगरसेवक म्हणून त्यांनी परिणामकारक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कामगिरी केली आहे. शहरी विकास, युवक सक्षमीकरण, महिला उत्थान, उद्योजकता, क्रीडा विकास आणि स्वच्छ शहर संकल्पना या विषयांवर त्यांचा विशेष भर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिव्हिल इंजिनिअरिंग व प्रॉपर्टी मॅनेजमेंट शिक्षणाचा उपयोग करून ते विकासकामे अधिक प्रभावीपणे राबवत आहेत.

 

खुले प्रशासन, संवेदनशील नेतृत्व आणि परिणाम-केंद्रित कार्यपद्धती ही त्यांची ओळख आहे. विनायकी शिष्यवृत्ती’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक भान जपले असून, ‘Sunny’s World’ या उपक्रमातून ते यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. तसेच मोफत महा-आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

Local ad 1