भाजपचा किल्ला उद्धवस्त करणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण?

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले. मात्र, भाजपने टिळक कुटुंबातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून धंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. आपला माणूस म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे. (Who is Ravindra Dhangekar who destroyed BJP’s stronghold in the town?)

 

 

 

शिवसेनेमध्ये 10 वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षांचा प्रवासही तेवढाच प्रदीर्घ आहे. सुरुवातीला 10 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनले होते. मनसेमध्ये अनेक पदावर त्यांनी कामे पाहिले. (Who is Ravindra Dhangekar who destroyed BJP’s stronghold in the town?)

 

 

शिवसेना, मनसे आणि आता काँग्रेस असा रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा राजकीय पक्षातील प्रवास राहिला आहे. 2009 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या वेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला. त्या नंतर 2014 मध्ये त्यांनी कसबा पेठेतून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मोठी लाट असतांनाही त्यांनी कडवी झुंज दिली होती. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांना 2019 मध्ये काँग्रेसमधून विधानसभेचे तिकिट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या ऐवजी अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांना उमेदवारी दिली होती.

 

 

असा आहे रवींद्र धंगेकर यांचा प्रवास

शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास. मतदारसंघातील ओबीसी चेहरा अशी ओळख. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. 4 वेळा नगरसेवक म्हणून कसब्यातून निवडून आले. 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. भाजपचे तत्कालिन उमेदवार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या विरोधात कडवी लढत. तेव्हापासून भाजप खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख. (Who is Ravindra Dhangekar who destroyed BJP’s stronghold in the town?)

Local ad 1