धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील तरूणाची पुण्यात आत्महत्या

नांदेड : पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे रोजगारासाठी वास्तव्यास असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या (Nanded District) नायगाव तालुक्यातील गडगा गावच्या तेवीस वर्षीय अविवाहित तरूणांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २४ आँगष्ट रोजी बुधवारी उघडकीस आली. या दु:खद घटनेचे वृत्त समजताच गडगा गावावर शोककळा पसरली आहे. (Suicide of youth in Nanded district in Pune)

 

 

 

लक्ष्मण ब्रम्हानंद भाकरे (वय २३ वर्षे) रा. गडगा ता. नायगाव जि. नांदेड असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गेल्या काही वर्षापासून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे रोजगारासाठी वास्तव्यास होता. (Suicide of youth in Nanded district in Pune)

 

 

पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मयत लक्ष्मण भाकरे हा तरुण करंजे मार्केट परीसरात चायनीजची गाडी चालवत असे. बुधवारी त्याच्या रूममध्ये रहाणारा मारूती माधवराव पवार हा रांजणगाव येथील कंपनीत आपली ड्यूटी संपल्यावर शिक्रापूर येथे परतला. यावेळी रूमचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी भाकरे यांना आवाज दिला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा ढकलून रुममध्ये पाहीले असता लक्ष्मण भाकरे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती शिक्रापूर पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा तपास ते करीत आहेत. (Suicide of youth in Nanded district in Pune)

Local ad 1