माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर निधन

नांदेड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर ( वय 78) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. (Former MLA Bapusaheb Deshmukh Gorthekar passed away)

 

 

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी ४ वाजता गोरठा (ता. उमरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Former MLA Bapusaheb Deshmukh Gorthekar passed away)

 

 

 

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची काल प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हायपॉवर व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मतदारसंघात शोककळा पसरली आहे. (Former MLA Bapusaheb Deshmukh Gorthekar passed away)

 

 

भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तसेच कार्यकर्त्यांचे जाळेही होते. आजही त्यांची मतदारसंघात चांगलीच पकड होती. त्यामुळे भोकर तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे

Local ad 1